About Mutt

गुरुब्रम्हा गुरूविष्णू गुरुर्दैवो महेश्वरा || गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नमः ||

सद्गुख श्री स्वामी समर्थ महाराज की जय || सद्गुरु श्री नवनितानंद महाराज की जय ||

भगवान श्री परशुरामाच्या पावन भुमीत आणि सद्गुरु श्री भालचंद्र महाराज्यांच्या निकट वसलेल्या कणकवली तालुक्यातील बोर्डवे गावात सुदंरवाडी येथे श्री नवनितानंद महाराज यांचा जन्म झाला. बालपणापासुनच श्री महाराजांना परमार्थाची ओढ होती. परमेश्वराच्या सेवेत कधी खंड न पडता श्री महाराजांनी आपले शालेय शिक्षण गावी आणि मुबंई येथुन पुर्ण केले वनोकरी निमित्त मिल मध्ये रुजु झाले. या दरम्याण सात रस्ता मुबंई येथे दत्त उपासक शिंदे यांच्याशी महाराजांचा सपर्क झाला. या दत्त दरबारात सेवा करता करता एकदा शिंदेनी महाराजांची भेट खडवली येथील श्री मयेकर महाराज यांच्याशी घडवुन दिली, नव्हे जनु गुरुमाऊलीने आपल्या सद्‌शिष्याला आपल्याकडे बोलावून घेतले. हे गुरुत्वाकर्षण येवधे प्रबळहोते की नकळतच वांरवार महाराज खडवली येथील मयेकर महाराजांच्या मठात सेवा करुलागले. मयेकर बाबांनाही महाराजांचा लळा लागला होता. एवधाकी श्री मयेकर महाराज स्वतःअन्न शिजवून मोडकमहाराजांना आपल्या शेजारी बसवून दोघेही अन्न ग्रहन करीत असे.योग्य तेवधी सेवा पुर्ण झाल्यावर एके दिवशी श्री मयेकर बाबांनी श्री नवनितानंद महाराजांना गुरुमंत्र दिला आणि निक्षुण सांगितले की यानंतर आध्यातमातील मला काहीच विचारू नये,स्वयं प्रेरणेने पारमार्थीककार्य करावे. तेव्हा पासुन सद्गुरू प्रेरणेने परमार्थचे कार्य श्री महाराजांनी अखंड आणि अविरतपणे चालु ठेवले. गुरुसांप्रदाय नुसार अखंड दत्तसेवा करत असतांना स्वामी समर्थाची बखर महाराजांच्या वाचनात आली. बखरीत दिलेल्या पत्त्यानुसार महारांजानी दादरच्या स्वामी मठामध्ये जाऊण स्वामींचे दर्शण घेतले. स्वामीच्या दिव्य स्वरूपाणे महाराज देहभान विसरुण गेले आणि परमानंदात तल्लिण झाले. तेव्हा पासुन महाराजांचे जिवन स्वामीमय झाले. घरामध्ये नित्य स्वांमी पुजन सुरु केल्यानंतर एकेदिवशी स्वामी आदेशानुसाराच दुखी: पिडितांना उदी देऊन स्वामी नामाचा प्रसार सुरू केला व तो वसा अखंड पणे सुरु आहे. दिवसेन दिवस स्वामीभक्तांची गर्दी वाढुलागली व तरूण पिढीला स्वामी सेवेतकार्यारत करण्यासाठी महारांजानी एक मंडळ तयार केले. एकवर्षा नंतर २००२ साली मंडळाचे रुपांतर ट्रस्ट मध्ये करण्यात आले या दरम्याण महाराजांनी स्वामीच्या आदेशानुसारच दिक्षा देण्यास सुरुवात केली. मठाच्या कार्याचा विस्तार आता अधिकच वाढतच चालला होता. वारंवार महाराज शिष्यांना घेऊन अक्कलकोट येथे महाराजांचे दर्शन घेण्यात जात असत. यादरम्याण समाधि मठाचे प्रमुख पुजारी चोळप्पांचे वंशज कै. सुरेश पुजारी म्हणजेच 37 महाराज यांना झालेल्या स्वामीच्या संकेता नुसार गुसरुप्रतिपदा उत्स्वाची सेवा कल्याण येथील आपल्या मठाला मिळाली. तेव्हा पासुन स्वामीच्या इच्छे नुसारच आपल्याला या उत्सवात सामिल व्हायचे भाग्य लाभले. एकदा श्री नवनितानंद महाराजांच्या मनात आले की दर गुरुवारी मठात पालखी सोहळा सुरु व्हावा. स्वामी आज्ञा मिळताच महाराजांनी पालखी बनवण्याचे नक्की केले. त्याच वेळी अक्कलकोट येथे अप्पु महारांना स्वांमीचा दुष्टांत होऊन, त्यांनी महाराजांना फोन करूण नविण पालखी न बनवण्यास सांगितले व अक्कलकोट येथील समाधी मठातील जुनी पालखी कल्याण मठाला दिली. याच पालखीतुन अक्कलकोट येथील समाधी मठातील स्वामींचा मुखवटा अक्कलकोट प्रदषिणेसाठी निघत असे. याच पालखितुन चोळप्पा महारांज्यांच्या घरातील गणपतीचे आगमण आणि प्रस्ताण होत असे. हीच पालखी स्वामीच्या संकेता नुसार आपल्या मठाला मिळाली. आपले परम भाग्य की आपण आपल्या ती खांदयावर घेत आहोत. कल्याणच्या या मठात प्रमुख चार उत्सव होतात. आपल्या मठात प्रत्यक्ष श्री सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु श्री साईनाथ महाराज, सद्गुरु श्री गजानन महाराज आणि आई मोराई माता स्थानपन्न आहेत. तसेच मठाच्या आवरात श्री गुरुदत्त मंदिर, श्री Reet सिद्धी अष्टविनायक महागणपती मंदिर, लिंगेश्वर मंदिर, संतोषि माता मंदिर आणि दक्षिणमुखी मारुती मंदिर अशी देवस्थाने आहेत. मठात स्वामी प्रकट दिन, दत्तजयंती, गुरपोर्णिमा, नवरात्रीतील अष्टमी या चार प्रमुख उत्सवाबरोबर महाशिवरात्र, नवरात्री, गणेशउत्सव, हनुमाण जयंती साजरे केले जातात. प्रतेक उत्सवात होम आणि भडारा होतो. आणि हजारो च्या संख्येने भक्त भाविक यांचा लाभ घेतात. तसेच कार्तिकमहिन्यात पांडव पंचमी पासुन ते कार्तिकी एकादशी पर्यंत हरीनाम सप्ताह संपन्न होतो, रोज किर्तने होतात. कोजागिरी पोर्णिमा र्तिंपुरारी पोर्णिमेला रात्री संपुर्ण मठाच्या आवारात पणत्या पेटवुन दिव्यांची आरास केली जाते. या नयनरम्य वातावरणात नामस्मरण काराची साधना होते. ह्य अनुभव विलक्षण व अवस्मरनिय असतो. मठाच्या आवारात मंदिरांबरोबर वड, पिंपळ, पेरु, आंबा, केळी, नारळ ,सुपारी तसेच अनेक फुलझाडे, वेली, यांचे संगोपण करूण गुरुमाऊलीनी निसर्ग व झांडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गेल्या काही वर्षापासुन स्वामी नामाचा प्रसार कल्याण पासुण सुरु होऊण डोबिंवली, ठाणे, अलिबाग, मुरुड, रत्नागिरी जिल्हा, Rg जिल्हा, गोवा अशा संपुर्ण कोकण भुमीत १५ नविण मठाच्या रुपाने विस्तारत आहे. आपला हा स्वामी परीवार दिवसेन दिवस वाढतच चालला आहे. आपल्यला या स्वामी परीवाराचे विराट दर्शन गुरुप्रतीपदेच्या उत्सवाच्या निमित्ताने होत असते. हे सर्व कार्य यशस्वी रीत्या राबवण्यासाठी श्री महारांजाच्या मार्गदर्शनाखाली तरूणाई दिवसरात्र एककरते. वंदनिय गुरुमाऊलमनि येथे अध्यात तरूणाईत रुजवला आहे. ज्या वयात जगात अनेक प्रलोभणे, वाईट सवई खुणवत असतात त्याच वेळी कल्याण मठातील तरूण फोज स्वामी व [Hd आर्शिवाद , मठातील पौधांचे अनुभव, तरुणाईची जिद्द घेऊन काम करतात. कारण त्यांच्यासाठी सद्‌गुरूसेवा आणि [HIATT पालन हे जिवन आहे. आणि या तरूण फौजेची काळाजी घेण्यासाठी प्रत्यकवेळी खंभीरपणे उभ्या असतात त्या माई महाराज. मठात येण्याऱ्या प्रत्येक गुरूबंधु, गुरुभगिनी व भाविकांचे अतिशय प्रेमाणे आदरतिथ्य माई करत असतात. तरी आपण कल्याणच्या या मठात दर्शण घेऊण स्वामी कृपेचा लाभ जरुर घ्यावा.

स्वामी हो... .